असभ्य वर्तणूक करणाऱ्या, पोलिसांशी नडणाऱ्या..मद्धधुंद युवकाला पोलिसी खाक्या…

550

असभ्य वर्तणूक करणाऱ्या, पोलिसांशी नडणाऱ्या..मद्धधुंद युवकाला पोलिसी खाक्या…

भरचौकात पत्नी ला करीत होता मारहाण…

चंद्रपूर – शहरातील बेंगलुरू बेकरी जवळ आज संध्याकाळच्या सुमारास सुरज सुरमवार नावाचा युवक मद्धप्राशन करून आपल्या पत्नीसोबत वादविवाद घालत रोडवरती तीला मारहाण करीत होता. तेथूनच शहर पोलीस स्टेशन चे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष निंबोडकर यांनी त्या युवकाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो युवक त्यांच्याशी असभ्य वर्तन केल्याने त्यांनी आपले पोलीस पथक बोलावून सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्या युवकाला पोलिसी खाक्या दाखवत त्याला शहर पोलीस स्टेशन येथे आणत त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु आहे. सदर युवक हा बल्लारपूर येथील असून त्याचे पत्नी सोबत अनेक दिवसापासून भांडण सुरु आहे. त्याच्या विरुद्ध महिला तक्रार निवारण मध्येही तक्रार नोंद आहे.शहर पोलीस पथक नेहमी गुन्हेगारा न चांगलेच धडे शिकवत असतात, गेल्या वर्षभरात शहर पोलिसांची चांगली कामगिरी राहिली आहे. त्यांनी अनेक गुन्ह्यात आरोपीना तात्काळ जेरबंद केले आहे हे विशेष!