क्रिकेट बुकी ला 8लाखाचा डोस? त्या पोलीस उपनिरीक्षक चा कारनामा…..गोपाला.. गोपाला.. हरी ओम गोपाला…

445

क्रिकेट बुकी ला 8लाखाचा डोस? त्या पोलीस उपनिरीक्षक चा कारनामा…..गोपाला.. गोपाला.. हरी ओम गोपाला…

 

चंद्रपूर – एरव्ही गुन्ह्याचे प्रमाण जरी वाढले पण त्यावर अंकुश लावण्याचा पोलिसांमार्फत प्रयत्न सुरु आहे. पण पोलीस विभागातही असे काही अधिकारी कार्यरत आहे जे स्वतः च्या आर्थिक फायद्या करीता नको ते प्रलोभन देतात आणी गुन्ह्यात मदत करण्याचे आश्वासन देतात. पण एका क्रिकेट बुकी सोबत या उलट घडले आहे. त्या पोलीस कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने त्या बुकीला मदतीच्या आश्वासन खातीर (गुन्ह्यामध्ये )आधी सहा लाख रुपये आणी चार्जशीट लवकरात लवकर पाठवण्या करीता दोन लाख रुपये दिले. मात्र त्या पोलीस उपनिरीक्षकाला या आरोपीना कुठलीच मदत करता आली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चालत असलेला तपास असल्यामुळे तो पोलीस उपनिरीक्षक अलगदच राहला. सहा महिन्या अगोदर घडलेल्या या घटनेला सहा लाखाचा डोस आणी चार महिन्या अगोदर आणखी दोन लाखाचा डोस त्या क्रिकेट बुकिं ला त्या पोलीस उपनिरीक्षक ने दिला ?. आपली फसगत झाल्याची समजताच त्या बुकिं ने त्या अधिकाऱ्याला आपल्या रकमेची वापस मागणी केली, अधिकाऱ्याने होकार ही दिला मात्र तारखेवर तारीख देत त्या अधिकाऱ्याने या बुकी ला हुलकवानी दिली आहे. तब्बल आठ लाख रुपयाची त्या बुकी ला टोपी बसल्याने त्याला धक्का पोहचला आहे? आता त्यांचावार गोपाला गोपाला हरी ओम गोपाला म्हणण्याची वेळ आली आहे.