भंगार चोर, मिस्त्री, डिझेल चोर… पत्रकार.. आवरा यांना अती होते न
चंद्रपूर – लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिताला आता भंगार चोर, डीजेल चोर तसेच ड्राइवर व्यक्तींना पोर्टल आणि काही वृत्त पत्र व्यावसायिककांनी पत्रकारितेला पैशाचा धंदा बनवत मेजवानी सुरु केली आहे. आता तर चक्क एका मिस्त्री (बांधकाम करणारा ) ला ओळख पत्र देऊन पत्रकार बनवून गावात फिरणारी एक टोळी निर्माण झाली आहे.
हेच नाही तर टीव्ही दुरुस्ती करणारा मेक्यानिक भी पत्रकार बनून इकडे तिकडे फिरत आहे. पैशाची वसुली करत संध्याकाळी दारू डोसपणे आणि चिकन, मटण खात ताव मारत पत्रकार म्हणून स्वतःची बहादूरकी मारत टिंग्या हाकने हाच प्रकार सुरु आहे.आज काल चंद्रपूर शहराच्या बार मध्ये झोल झालं पत्रकार खपवून घेत आहे.
पत्रकारितेच्या आड हे भामटे आज काल जिल्हा भर आपली जशी प्रशासनिक अधिकारी आणि पोलीस अधिकारी असल्या सारखे ओळख दाखवत वसुली फंडा करत आहे. चांगल्या पत्रकारितेला डांबर बाज करणाऱ्या या भामट्याना लवकरच जिल्हा माहिती अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने आवर घालावा जेणेकरून चांगल्या पत्रकारांना त्रास होणार नाही. गळ्यात ओळख पत्र आणि खिशात चार पेनी घालून फिरणाऱ्या भामट्या पत्रकार यांना वेळीच आळा घाला नाहीतर हेच उद्या समाजाला डोकेदुखी राहणार आहे. यांचा कुठलाही समाजाशी पत्रकारिता संधर्भात घटक नसून फक्त खंडणी मागणे हा पर्याय आहे. या भामट्याचा ताबडतोब बंदोबस्त झाल्यास पत्रकारिता क्षेत्राला संरक्षण राहील आणि उपद्यापी करणाऱ्या वर नियंत्रण सुद्धा राहील.