सावधान! तुमच्या घरात चोर तर नाही…भाडेकरूची माहिती पोलिसांना द्या
चंद्रपूर – तुमच्या घरात भाड्याने कोण राहत आहे याची कल्पना तुम्हास आहे का, तुम्ही तशी माहिती भाडेकरूची आपल्या हद्दीतील संबंधित पोलीस स्टेशन ला दिली का.. जर दिली नसेल तर तात्काळ आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन ला त्याची रीतसर माहिती द्या.
बाहेर राज्यातून कामाच्या शोधात येणारे अनेक नागरिक जिल्ह्यात येत असतात पण यात सज्जन कोण हे ओळखणे कठीण असते. काई संधीसाधू आपला चोरीचा डाव साधण्यासाठी जिल्ह्यात घराचा सहारा घेतो आणि भाडेकरू बनून वास्तव्यास येतो. आपला भाडेकरी कौन याची माहिती आणि त्याचे ओळखपत्र सादर करणे अनिवार्य असताना या कडे घरमालकांनी पाठ च फिरवाल्याचे दिसत आहे. तुमचा भाडेकरी कुठला आणि त्याचे काम काय आणि रेकॉर्ड काय त्याची माहिती पोलिसांना असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात चोराला तर आश्रय देत नाही न,याची खात्री करणे आवश्यक आहे.एरव्ही घरमालकांना याचा विसरच पडला आहे कायद्याने भाडेकरूची माहिती देने बंधनकारक आहे. जेणेकरून पोलिसांना गुन्ह्यातील कुठले आरोपी वास्तव्यास आहे याची कल्पना असते. जर आपण माहिती नसेल दिली तर त्वरित आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन ला कळवा.