ओ कलेक्टर लक्ष द्या… तुमचे अधिकारी रेती तस्करी ला प्राधान्य देत आहे… मग जीव गेले तर……… तुम्ही जागे व्हा?

443

चंद्रपूर – जिल्ह्यात रेती तस्करांनी धुमाकूळ माजवाला आहे. याला दुसरे तिसरे कोणी दोषी नसून महसूल प्रशासन पूर्णतः दोषी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील माढेली गावा अंतर्गत सोईट रेती घाटावर अक्षरशः रेती तस्करानी हमला चढवला आहे. महसूल प्रशासन हथबल झाला आहे. कलेक्टर विनय गौडा हे सध्या या रेती तस्करी विषयात आपली भूमिका बजवण्यात समर्थ दिसत नाही आहे. महसूल मधील मंडळ अधिकाऱ्याने वाहूतक करीत असलेल्या रेती धारकांना आपण पकडणार नाही हे सिद्धच करून टाकले आहे. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी मलाई खाऊन टाकत असेल तर मी फक्त काय स्वतः जाऊन तिर मारू असे उद्धट जवाब नागरिकांना देत आहे. कारवाई नाहीतर किमान तक्रार दऱ्याची तक्रार तर नोंदवा ही एक सहज भूमिका असते पण त्याला वरोरा उपविभागीय अधिकारी हा अपवाद आहे. करो सो कायदा ह्या अंतर्गत वावरणाऱ्या ह्या अधिकारी ची मुजोरी वावग्या योग्य नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती संध्रभात किती तरी गुन्हे दाखल होत असताना हा महसूल जागा होईल की काय हा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. न