अखेर प्रशासन जागे..
नव पथके गठीत..रेती तस्करांवर करणार मोठी कारवाई…
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कान उघडानी…. पोलिसांना मुख्य आरोपी अजूनही गवसले नाही..
चंद्रपूर – गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावर झालेल्या भ्याड हल्यात सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षा वर लोखंडी राड आणि धारदार शस्त्राने प्राण घातक हल्ला करण्यात आला होता. रेती माफिया न सोबत प्रशासनाची साठगाठ असल्या चाही गावकर्यांनी आरोप केला होता. वारंवार तक्रारी करून सुद्धा बघ्याची भूमिका घेणारे पोलीस आणि महसूल प्रशासन सध्या चांगलेच गोत्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दखली नंतर थातूर मातुर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगल्याच कान पिचक्या देण्यात आल्या असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. गोंडपिपरी तील अवैध रेती तस्करी वर पूर्णतः आळा बसवान्यकारिता नव पथक निर्माण केले गेले आहे. यामध्ये महसूल प्रशासनातील अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी व पोलीस पाटील यांचा समावेश केल्याचे वृत्त आहे. एक ठिकाणाहून अवैध रेती चे वाहन होणार नाही अशी सक्त ताकीद वारिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
पोलीस आरोपीच्या शोधात…
हल्यातील फरार आरोपीना अटक करण्याकरिता गोंडपिपरी तील ठाणेदार जीवन राजगुरू हे आपल्या पथका सह चंद्रपूरात रात्रौ तळ ठोकून होते. त्यासाठी त्यांनी स्थानिक पोलिसांनाही सोबत घेतले होते पण त्यांना एकही आरोपी गवसाला नाही. दिवसेंदिवस वाढत चालेलली गुंडगिरी पोलीस प्रशासन ला ही डोखे दुःखी आहे. आधीच हाथ नाही दिला तर गुंड गिरी च निर्माण नाही होत हे माहित असताना सुद्धा गोंडपिपरी तील घडलेला प्रकार हा जीवघेणा ठरत होता.ठाणेदारा नी यावर जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.