महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था जिवंत आहे का हो?- आमदार प्रतिभा धानोरकर

234

महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था जिवंत आहे का हो?- आमदार प्रतिभा धानोरकर..

तीन महिन्यात महिला, तरुणी बेपत्ता होण्याची सेंचुरी…. केव्हा शोध घेणार शासन?

चंद्रपूर – महारष्ट्रातील कायदा आणि सुव्यस्था जिवंत आहे का असा प्रश्न विचारत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत काल विधिमंडळात समाचार घेतला. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची महिलांची आणि तरुणी ची काय अवस्था आहे त्याचा आराखडा दिला. गेल्या तीन महिन्यात शंभरहून अधिक महिला तरुणी बेपत्ता झाल्याची त्यांनी विधिमंडळात माहिती दिली. त्यासोबतच महाराष्ट्र राज्यात 3500 अधिक 16ते 25 वयोगटातील तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. शासन या बेपत्ता महिलांचा शोध घेणार का? असा प्रश्न करीत आमदार धानोरकर यांनी महिलांवरील अत्याचारावर कठोर कायदा करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. फेसबुक, व्हाट्सअप या सारख्या सोशल प्लॅटफॉर्म चा वापर करून महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणे समोर येत आहे. यातून त्याचा फायदा घेत महिलांच्या अत्याचारात वाढ़ होत आहे.

अलीकडे महाराष्ट्रात महिलांवर घडलेल्या काही घटनामुळे महाराष्ट्र नक्कीच हादरलेला आहे. मुंबईतील वसतिगृहात विध्यार्थीनीची झालेली हत्या असो किंव्हा सरस्वस्ती वैद्य या महिलेची केलेली क्रूरपणे हत्या असो सोबतच राजुरा येथे कोळसा च्या उद्धयोगातून एका निष्पाप महिलेची हत्या करण्यात आली होती. त्यासाठी शासन नी कठोर उपाययोजना करून या वर शक्ती कायदा अस्तिवात आणण्याची मागणी आमदार धानोरकर यांनी केली आहे.