आयुक्त साहेब.. पादचारी मार्ग गायब झाला हो! अतिक्रमण नी कोंडी केली हो…

434

आयुक्त साहेब..
पादचारी मार्ग गायब झाला हो!
अतिक्रमण नी कोंडी केली हो…

 

चंद्रपूर – महानगर पालिकेने शहरात विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई चा जरी बडगा उभारला पण मुळात चंद्रपूर शहरात पादचारी (footpath)मार्गावर झालेल्या अतिक्रमाणावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना पादचारी चा मार्ग कुठे आहे हेच दिसेनासे झाले आहे. त्यांना दुचाकी प्रमाणेच रोड वरून चालावं लागत आहे. आणि त्यातून अपघात होण्याचे ही संकेत मिळत आहे. शहरातून गांधी चौक ते जठपुरा गेट पर्यन्त तर चक्क पदचारी मार्ग च गिळणकृत केल्याचं दिसत आहे. दुकानदार आणि स्टॉल, ठेले यांनी तर अतिक्रमण करत नागरिकांना रोड वर आणून ठेवलें आहे. नागरिकांना पर्याय नसल्याने त्यांना दुचाकी आणि चारचाकी च्या वाहणाच्या रांगेतच चालावे लागत आहे. चंद्रपूर बस स्टॉप ते तुकूम आणि बंगाली कॅम्प पर्यंत तर पाद मार्गावर तर जसे स्वतःचे प्रॉपर्टी असल्या सारख्या दुकानें उभारले आहे. कारवाई करावी अश्या कितीतरी मागण्या करून ही महानगर पालिका प्रशासन आवर घालण्यात अयशस्वी झाली आहे. शहरात विद्रुपी पेक्षाही मोठा मुद्दा हा असून पादचारी मार्गाचे अतिक्रमण च्या जाळ्यातून मुक्त करावे ही मागणी नागरिकांकडून होत आहे.जिल्ह्याचा प्रदूषण ने एक तर श्वास कोंडत चालला आहे त्यानंतर शहरात वाहतूक कोंडी होत आहे आणि आता तर पाद चारी मार्गालाही कोंडीत केले आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन आयुक्त विपीन पालिवाल यांनी कारवाई चे आदेश देण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे.