राम भाऊ हे बरे नव्हे! चालान न देण्याच्या मोबदल्यात दारूचा बंपर कशाला?

835

राम भाऊ हे बरे नव्हे!
चालान न देण्याच्या मोबदलयात दारू चा बंपर कशाला?

चंद्रपूर – शासनाच्या तिजोरीत महसूल आणि कायद्याचा धाक बसवन्या करीता वाहतूक यंत्रने ला वाहतुकीचे कठोर नियम अंमलबजावणी करीता कितीतरी जनजागृती अभियान आणि मार्गदर्शन शिबीर घ्यावे लागतात. वाहतूक व्यवस्था कुठेही कोलमडू नये या करीता वाहतूक व्यवस्थेचे कर्मचारी दिवस रात्र सेवा बजवतात. मात्र वाहतूक व्यवस्थेत कधी कधी नियमाला बगल देणारे ही आणि त्यातून आपली पोळी शिजवणारे ही कर्मचारी असतात. असाच एक प्रकार गेल्या साथ दिवसाअगोदर बँकेत असलेल्या एक्स आर्मी सुरक्षा रक्षक सोबत घडला आहे. बँकेतूने संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ड्युटी आटोपून तो सुरक्षा रक्षक घराच्या दिशेने निघाला मात्र त्यांच्या दुचाकी वाहनाला लाइट (प्रकाश)नसल्याने रामभाऊ ने अडवले व त्याला 2000रुपयाचे फाईन भरावे लागणार असे सांगितले. मग काय त्या सुरक्षा रक्षकाने आपण कमीत कमी कायद्याच्या चौकीटीत किमान दंड भरण्यास तैयार असल्याचे सांगितले. आणि त्यांनी आपण एक्स आर्मी मॅन असल्याचे सांगितले रामभाऊ नी त्याला जवळपास पाऊन तास तात्काळत उभे ठेव्हले मग तुम्हाला कॅन्टीन मधून दारू भेटतात तर ती आपल्याला हवी त्यासाठी आपण तुमच्या सोबत येणार असल्याचे सांगितले. सुरक्षा रक्षकाला चालान न बनवण्याच्या अटीवर कॅन्टीन मधला दारू चा बंपर रामभाऊ ला हवा होता. रामभाऊ नी त्या सुरक्षा रक्षक चा मोबाईल नंबर घेत आपण तुम्हाला फोन करू असे सांगितले. त्यानंतर रामभाऊ नी आज आपली ड्युटी ऑफ आहे आपल्याला कॅन्टीन चा बंपर हवा म्हणत त्या सुरक्षा रक्षकाला फोन केला. सुरक्षा रक्षकाने आपण ड्युटी असल्याचे सांगून आपले आता जमणार नाही संध्याकाळी बघू म्हणत फोन ठेऊन दिला. कायदेशीर कारवाई करीता दारू चा बंपर हवा हा नवीनच फॉर्मुला आज बँके मध्ये खमंग चर्चेचा विषय बनला आहे.