रेती तस्करी चा नवा डॉन मधु….
नावात काय ठेव्हल? रेतीत सार फावलं..
चार वर्षात 100 कोटी?माया…
अधिकाऱ्याचाही या कोटीत सहभाग?
तो उपविभागीय अधिकारी कौन?
चंद्रपूर, (प्रतिनिधी) १३ डिसेंबर
काय ती शान, काय तो तोरा… काय ते लक्सरीयस गाड्याचा ताफा एखाद्या अस्सल खजिनदाराला थाट बाट लावलेला मधु हा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. चर्चा त्याच्या थाट बाट ची नसून चर्चा आहे ती 2019 मध्ये कमकुवत असलेला मधु अवघ्या चार वर्षांमध्ये 100कोटी च्या मालकीचा मालक झाला? मधु नी कौन बनेगा करोडपती ची स्पर्धा खेळली नसून त्यांनी हा डाव रेती तस्करी मध्ये खेळला असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
चंद्रपूर गडचिरोली महामार्गांवर मधु चे एका ग्रामीण भाघात चक्क रोषणाई युक्त 1करोड चे फरारी ऑफिस थाठून आपले थाट ठोकले आहे. रोज संध्याकाळी या ऑफिस ला जलवा च जलवा केला जातो. मधु चे थाट पाहून ग्रामीण परिसरातलील नागरिक पण चक्क झाले आहे.
रोज 25ते 30गाडीचा ताफा या ठिकाणी असतो. आणि अस्सल गेम मग सजतो. यांच्या तोऱ्यात मुंबई, दिल्ली आणि इंदोर वरून फर्माईश पण पोहचवल्या जातात. मधु सक्रीय राजकारणात कुठेही नसून पहिल्या काळात एका नेत्याच्या संपर्कात होता त्या नेत्याला आता दूर सारवत मधु नी स्वतः च साम्राज्य निर्माण केल. अंधारी नदीला पोखरून मधु नी पहली आपली अर्थवयस्था जमवत करोडो रुपयाची रेती अकोला, अमरावती, मूर्तिजापूर, बुलढाणा, शेगाव आणि मधल्या काळात वर्धा जिल्ह्यात महसूल प्रशासनाला हातमिळवनी करत कोट्यावधीची रेती पुरवली त्यातून मधूला चक्क तीन महिन्यात 17 कोटी रुपये मिळाले. मधु आणि टीम चे आणखी धाडस वाढले त्यांनी आपले पाय पसरवत गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रेती घाट घेत नवीन फंडा निर्माण केला. त्या घाटाला परमिशन च्या पलीकडे म्हणजे 10पट रेती उपसा करून MH26, MH30, आणि MH 32 एल एल पी वाहणाने आरमोरी-गडचिरोली-सावली -मूल-चंद्रपूर -वरोरा -मार्गे काम फतेह करत रेती तस्करी जोमात सुरु आहे.
मधु चे साटे लोटेही तसेच आहे. गडचिरोली जिल्ह्यात मधु च्या पत्नी एका मोठ्या पदावर नियुक्त आहे. त्या मुळे मधु ला गडचिरोली जिल्ह्यातून कुठलीही अडचण निर्माण होत नाही बॉर्डर क्रॉस झाले की मधुला रेती तस्करी साठी मग खुलीच छुट आहे. जसे गडचिरोली जिल्ह्यातील जी महिला मोठ्या पदावर आहे तिचा ब्याचमेट पण चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या हद्दीतून मोकळीक रान करून मधुला पूर्णतः सहकार्य करीत आहे. मधु सध्या मूल मधून पण रेती तस्करी चे काम जोमात करत आहे. आता कोट्यवधी कमावणार तर वाटावे तर लागणार तर मधु त्यामध्येही एक्सपर्ट आहे. लक्सरीयस गाड्या पुरवणे.. पुढे त्यांचे परफेक्ट नियोजन करणे ही त्याच्यात मोठी गुणवत्ता आहे.
मधु चा फॉर्मुलाच आगळा वेगळा आहे. मधु रेती घाटाच्या नावावर पार्टनर ही गोळा करतो आणि त्यांना भरघोस उप्पनाची हमी देतो. त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मधु कडे चांगलेच कार्यकर्ते आहे. पण मधुला जो मेन सपोर्टर आहे तो मराठवाड्यातील पडद्या मागचा खरा हिरो आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात उपविभागीय पदावर कार्यरत तो अधिकारी मधु चा खास मित्र म्हणून ओळखल्या जातो आणि त्या अधिकाऱ्याचा पैसा मधु उभारतो. आणि त्यांना महिन्याकाठी हिशोबाची फाईल घेऊन मधु संपूर्ण रोख चोख हिशोब देतो. अवघ्या चार वर्षात मधु च्या 100कोटी च्या कमाईचे रहस्य इनकम टॅक्स ला ही माहिती नाही? मधु जिल्ह्यात अगदी रेती तस्करी चा डॉन च झाला आहे. कुठलेही कारवाई करायला गेल्यास मधु ची गांधी स्टाईल नेहमी सज्जच असते. त्यामुळे सध्यातरी मधुला वरदान दिल्या असल्याचे बोलल्या जातं आहे.