9 डिसेंबर 2023 चंद्रपूर – जिल्ह्यात वरोरा तालुक्यातील टेम्भूरडा येथे काल रात्री दरोडे खोरांनी बँक ऑफ महाराष्ट्र ला फोडण्याचा प्रयन्त केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेने दरोडे खोरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.
डिसेंबर 2021 मध्ये हीच ती दरोडे खोरांनी बँक फोडली होती त्यावेळेस 13लाख रुपये या ठिकाणाहून दरोडे खोरांनी लॉकर फोडून नेले होते. मात्र त्यावेळेचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या नेतृवात स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आणि त्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे आणि संदीप कपडे च्या टीम ने दरोडे खोरांचा पाठलाग करीत उत्तरप्रदेश वरून आरोपीना अटक करून आणले होते.
स्थानिक नागरिकांच्या अनुसार रात्री जवळपास एक वाजताच्या सुमारास पाच ते सहा दरोडे खोरांनी ग्रामपंचायत ची भिंत फोडित बँक ऑफ महाराष्ट्र च्या भिंतीला बोगदा तयार करत होते. मात्र नागरिकांनी आरडा ओरड करताच दरोडे खोरांनी ग्रामपंचायत मधील सि सी टी वी आणि एक एल ई डी टीव्ही सोबत नेत त्याठिकाणाहून पसार झाले. दरोडे खोर पसार होताच नागरिकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली. दरडेखोराची छन्नी होतोडे तसेच चप्पल घटना स्थळा वरून जप्त करण्यात आले आहे.दरोडे खोर हे नागपूर मार्गानी पळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचा ताफा पोहचला असून दरोडे खोरांचा पुन्हा एक प्रयन्त जिल्ह्यातील नागरिकांनी हाणून पाडला आहे.