चंद्रपूरात पुन्हा गुंडागर्दी, जनार्धन मेडिकलजवळ हाणामारी
चंद्रपूर, दि. ८ डिसेंबर २०२३: चंद्रपूर शहरात पुन्हा एकदा गुंडागर्दीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जटपुरा गेट परिसरातील जनार्धन मेडिकलजवळ विक्की, ललित आणि वकार या तिघांच्यामध्ये कुठल्या तरी मतभेदावरून वाद झाला. या वादातून हाणामारीला तोंड फुटले. दोन्ही गटातील मोठ्या प्रमाणात शुटर जमा झाले होते. या हाणामारीत अनेक जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी काही लोंकाना ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की, ललित आणि वकार हे तिघेही चंद्रपूरचे रहिवासी आहेत. या तिघांमध्ये कुठल्या तरी कारणामुळे वाद झाला. या वादातून हाणामारीला तोंड फुटले. या हाणामारीत विक्की आणि वकार या दोघांना गंभीर जखम झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे चंद्रपूर शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.