चंद्रपूर: शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांच्यात राडा, पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

549

चंद्रपूर: शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांच्यात राडा, पोलिस कर्मचाऱ्यालाही  धक्काबुक्की

चंद्रपूर, दि. 04 डिसेंबर 2023: चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांच्यात राडा झाला. शिवसेना (शिंदे) गटाच्या महिला पदाधिकारी प्रतिमा ठाकूर यांच्या मुलांना शिवसेना (उबाठा)चे पदाधिकारी स्वप्नील काशीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याने हा राडा झाला.

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन आले असता या ठिकाणी मोठी बाचाबाची पाहवयास मिळाली. या मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यालाही धक्काबूक्की झाल्याने दोन्ही ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यावर पोलिसांनी रात्री उशिरा 353 चा गुन्हा नोंद केला. सोबतच क्रॉस रिपोर्ट झाल्याने दोन्ही पक्षाच्या एकमेकांविरुद्ध तक्रारी वरून ही गुन्हा नोंद करण्यात आला.

नेमका हा राडा कशामुळे झाला ते अद्याप कळालेले नाही आहे. मात्र जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था चे हाल बेहाल होत चालले आहेत.

पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टेशनात आणून चौकशी केली.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण

या राड्यामुळे चंद्रपुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला असला तरी, हा राडा कशामुळे झाला याची चौकशी करण्याची गरज आहे.