शासन आपल्या दारी; अधिकारी दुपारी आपल्या घरी

699

*शासन आपल्या दारी; अधिकारी दुपारी आपल्या घरी*

चंद्रपूर, दि. ३० नोव्हेंबर: सह दुय्यम निबंधक कार्यालय चंद्रपूर येथील सब रजिस्ट्रार बोमेश्वर मोहोरे हा आज दुपारी मधल्या सुट्टीत दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी घरी गेला. त्यानंतर ३ वाजून ४९ मिनिटांनी परत आला. दुपारी अधिकारी गायब राहिल्याने नागरिकांना वाट बघत बसावं लागले.

सरकार एकीकडे शासन आपल्या दारी उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजना आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, दुसरीकडे काही गैरव्यवहारी अधिकारी आपल्या घरी पळून जात आहेत.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात जमीन विक्री संदर्भातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर सब रजिस्ट्रार बोमेश्वर मोहोरे दीर्घ रजेवर पळाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा कामावर रुजू झाले. मात्र, त्यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.या कार्यालयात दलाल वाढल आहेत. त्यांच्याकडून गेल्याशिवाय कामच होत नाही. मोठया प्रमाणात संपत्ती गोळा करून सब रजिस्ट्रार बोमेश्वर मोहोरे ने माया जमविने सुरू केले आहे. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

सब रजिस्ट्रार बोमेश्वर मोहोरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करण्याचा आरोप आहे. त्यांनी कार्यालयातून मिळणाऱ्या पैशांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. त्यांनी जमीन खरेदी, सोने खरेदी, नवीन वाहन खरेदी अशा विविध प्रकारे संपत्ती गोळा केली आहे.

या प्रकरणी उच्चाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे.

शासन आपल्या दारी उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये जाण्याची गरज कमी होईल आणि त्यांना शासकीय योजना आणि सेवांचा लाभ लवकर आणि सहज मिळेल. मात्र, जर असे गैरव्यवहारी अधिकारी असतील जे नागरिकांना त्रास देतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात, तर या उपक्रमाचा फायदा नागरिकांना होणार नाही. अशा गैरव्यवहारी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्यांना निलंबित केले पाहिजे. तसेच, त्यांच्यावर चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या बेकायदेशीर संपत्ती जप्त केली पाहिजे. जर सरकारने अशा गैरव्यवहारी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली, तरच शासन आपल्या दारी उपक्रमाचा फायदा नागरिकांना होईल. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.