💥💥ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी ट्रॅव्हल्स चालकाचे डोके फोडले?
सेवानिवृत्त होण्याकरिता काही दिवस शिल्लक असताना पुन्हा एक आरोप..
पोलिस अधीक्षक कडे तक्रार…..
चंद्रपूर – ब्रमुपुरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुधाकर अंबोरे यांनी एका ट्रॅव्हल्स चालकाच्या कानशिलात लावून त्याच्या डोक्यावर दांडूक्याने प्रहार करीत त्याला रक्तबंबाळ केल्याची घटना सोमवारी ब्रमुपुरी येथील ख्रिस्तानंद चौकात घडली.गडचिरोली कडून नागपूर कडे जाणाऱ्या MH ४९ AT३६२५ नंबर ची ट्रॅव्हल्स रेल्वे फाटक बंद असल्याने थांबली होती.दरम्यान ठाणेदार अंभोरे हे MH २९ AR८८५५ खासगी वाहनाने ब्रम्हपुरी कडे येत होते.
ट्रॅव्हल्स च्या डाव्या बाजूने कार पुढें नेत ट्रॅव्हल्स ला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.मात्र ते गणवेशात नसल्याने ट्रॅव्हल्स चालक मोहन अडविकर यांनी ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी न थांबवता ख्रिस्तानंद हॉस्पिटल चौकात थांबवली असता त्याला ठाणेदार अंभोरे यांनी कानशिलात लागवत दांड्या ने मारहाण केल्याचा आरोप पीडिताने केला आहे.मारहाणीची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन मध्ये दिली असता ती तक्रार घेतली नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या कडे केली आहे. या आधीही अंभोरे यांच्यावर एल सी बी ला असताना ट्रॅफिक कार्यलया च्या बाजूला चंद्रपुरातील प्रतीशिष्ट व्यापाऱ्याला त्यांनी मारहाण केली होती.व्यापाऱ्यांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाई ची मागणी केली होती.त्याच वेळी अंभोरे यांची एल सी बी पोलिस निरीक्षक पदावरून उचलबांगडी केली होती. सेवानिवृत्त होण्या करिता काही दिवसे शिल्लक असताना हा प्रकार घडल्याने पुन्हा त्यांचा मारहाणीचा विषय समोर आल्याने पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.