ढिसाळलेल्या पार्कींग व्यवस्थेला उपचाराची गरज?वाहतूक व्यवस्था कोलमडली… हायवे वर चक्क हॉटेलची रोड वर पार्कींग….

278

💥 ढिसाळलेल्या पार्कींग व्यवस्थेला उपचाराची गरज?वाहतूक व्यवस्था कोलमडली… हायवे वर चक्क हॉटेलची रोड वर पार्कींग….

चंद्रपूर – अनेक कमर्शिअल कॉम्प्लेक्स असो की हॉटेल, बार व्यावसायिक यांना आधी पार्कींग ही महत्वाची बाब असते.नियमात पार्कींग ला जितकी जागा आवश्यक असते ती सर्व त्या कागदपत्रांवर ओके असते. मात्र जेव्हा पार्कींग ची वेळ येते ही अवस्था इतकी वाईट असते की ते गिळंकृत झाल्याचे दिसते.सध्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या बार ची जर यादी पाहली तर पार्कींग की चार्जिंग हा प्रकार पहावयास मिळत आहे. एकतर शहरातील वाहतूक कोंडीने चंद्रपूर शहरातील जनता त्रस्त झाली आहे. जागो जागी अतीक्रमण ने आपले साम्राज्य पसरलेले आहे.प्रशासन अजूनपर्यंत तरी उपाययोजना च आराखडा तयार करत आहे.शहरातील वाहुतुक कोंडी मूळ कितीतरी अपघात घडत आहे. वाहतूक व्यवस्था ढासळली असून त्याला उपचाराची प्रंचड आवश्यकता आहे.सध्या अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून नोव्हेबरपर्यंत च्या अखेरीस पर्यंत १२लोकांनी जीव अपघाता मध्ये जीव गमवला आहे. येणाऱ्या काळात एम इ ल रोड ते मुल रोड वर असणाऱ्या काही हॉटेल व्यवसायकांनी तर रोड ला च पार्कींग बनवलेली आहे. ट्रॅफिक व्यवस्थेने याकडे याकडे एकदाही लक्ष घातले नाही आहे?जर हेच हाल राहले तर एखाद्या दिवशी मोठा अपघात या ठिकाणी घडल्या शिवाय राहणार नाही.याठिकाणी रोषणाई करून रात्री चक्क हॉटेल व्यावसायिक नियमांची पायमल्ली करीत असतात, प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे? वाहतूक यंत्रणेने शहरातील तसेच जिल्हयातील सुरू असलेल्या हॉटेल व्यवसायकिंच्या ढिसाळ पार्कींग ला ब्रेक लावावा ही मागणी जनतेतून होत आहे.त्यासोबतच आरटीओ ,आणि महामार्ग पोलिसांनीही या कडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.