घरफोडी करणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद

192

चंद्रपूर : एलसीबी पोलीस कर्मचाऱ्याने केली घरफोडी

चंद्रपूर, दि. 19 नोव्हेंबर 2023 : चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील सरकार नगर येथे 14 नोव्हेंबर रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडी प्रकरणी रामनगर पोलीस तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी एक धक्कादायक माहिती उघडकीस आणली. या घरफोडीत सहभागी असलेला आरोपी एलसीबी पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याचे आढळून आले आहे. एलसीबीच्या नरेश डाहूले या पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केल्याचे आढळून आले आहे. 14 नोव्हेंबर रोजी च्या रात्री घटनास्थळावर संशयास्पद रित्या फिरत असल्याचे सीसीटिव्ही कॅमेर्यात दिसत आहे.

आरोपीचे नाव नरेश डाहूले असे आहे. तो एलसीबीमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहे. 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास डाहूले घटनास्थळावर संशयास्पद रित्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. यावरून त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

डाहूलेने पोलिसांना चौकशीत कबूल केले की, त्यानेच ही घरफोडी केली आहे. त्याला घरफोडीची सवय असल्याचेही त्याने सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर गुन्हे शाखा करत आहे.

या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला काळे फासले आहे. पोलिसांनीच घरफोडी केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.