पोलिस विभागातील एका बड्या निष्क्रिय अधिकाऱ्याची होणार उचलबांगडी; गृह विभागातुन हालचालींना वेग

554
8 आयपीएस अधिकाऱ्यांवर 5 वर्षांची बंदी
8 आयपीएस अधिकाऱ्यांवर 5 वर्षांची बंदी

*पोलिस विभागातील एका बड्या निष्क्रिय अधिकाऱ्याची होणार उचलबांगडी; गृह विभागातुन हालचालींना वेग*

चंद्रपुर : पोलीस विभागात बड्या पदाची जबाबदारी मिळालेल्या एका अधिकाऱ्याच्या निष्क्रीयतेमुळे त्याला त्या पदावर उचलबांगडी होण्याची वेळ आली आहे. यासाठी आता गृह मंत्रालयातुन हालचाली सुरू झाल्या असून येत्या काही दिवसांत चंद्रपूर पोलीस विभागात धक्कादायक बदल होणार आहेत.

 

चंद्रपूर पोलीस विभागातअनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. यात अनेकांनी आपल्या आपली वेगळी छाप सोडली आहेत. ज्यांना ज्यांना सक्षमपणे जबाबदारी मिळाली त्यांनी आपले कौशल्य पणाला लावत आपली वेगळी ओळख निर्माण केली. यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद जरी झाले नसले तरी यावर मोठी जरब बसली आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यश मिळाले. मात्र सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कायदा आणि सुववस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. ज्या अधिकाऱ्याला या जिल्ह्याची मोठी जबाबदारी मिळाली त्याकडून मात्र सपशेल निराशा पदरी पडली. यापूर्वी याच पदावर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेतुन या विभागाचा दरारा निर्माण केला आणि आपली एक वेगळी छाप सोडली. मग अवैध धंदे असो की संघटित गुन्हेगारी, आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार चोरट्यांची टोळी असो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सर्व क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. मात्र यानंतर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याने हा विभागच निष्क्रिय करून टाकला. केवळ भुरटे चोर, दुचाकीचोरांना अटक करून, त्याची प्रसिद्धी करून आपली पाठ थोपटून घेतली. मात्र जिल्ह्यातील महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्याकडे धाडसी नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता हवी, आपले यंत्रणा सक्षम हवी, कर्मचाऱ्यांशी आणि खबऱ्यांशी योग्य संवाद हवा. मात्र या अधिकाऱ्यामध्ये हे कौशल्यच दिसेनासे झाले. अवैध धंद्यांवर ‘वार’ करण्याऐवजी आपल्या जबाबदारीचा ‘कोंडा’ या अधिकाऱ्याने केला. कारवाईच्या नावाने कागदी घोडे नाचविण्यात परम समाधान मानले.

 

*गृह मंत्रालयाकडून कारवाईच्या हालचाली सुरू*

या अधिकाऱ्याने कागदी घोडे कितीही नाचविण्याच्या प्रयत्न केला तरी प्रत्यक्ष दिव्याखाली अंधार किती याची माहिती गृह विभागाला आहे. जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, ड्रग्ज, कोळसातस्करी, वाळुतस्करी, डिझेल चोरी, संघटित गुन्हेगारी हे अवैध धंदे जोमात आहेत. असे असताना या कारवाईकडे या अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक काणाडोळा केला. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या निष्क्रीयतेची चर्चा थेट गृहमंत्रालयापर्यंत पोचली आहे. येथून याची गंभीर दखल घेण्यात आली असून या अधिकाऱ्याची या पदावरून गच्छंती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत या अधिकाऱ्याची उचलबांगडी होणार आहे, अशी माहिती आहे. मात्र या पदासाठीची नियुक्ती आता कुठल्याही राजकीय दबावाखाली होणार नसल्याची माहिती आहे.

 

*…आता काठी चालवून उपयोग नाही*

आपल्या गच्छंतीची कुरबुर कानी येताच आता या अधिकाऱ्याने आपण काही करतोय हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कधी नव्हे ते कारवाई करण्याचा सपाटा असल्याचे भासविण्यात येत आहे. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. साप गेल्यावर लाठी मारून उपयोग नाही. अशीच अवस्था सध्या या अधिकाऱ्याची झाली आहे. मात्र या अधिकाऱ्याची उचलबांगडी होण्याची कारवाई आता अटळ आहे.