पोलीस महासंचालकपद रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

149

महाराष्ट्राच्या पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर, रजनीश सेठ यांच्या जागी फोन टॅपिंग प्रकरणामुळं वादात अडकलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नव्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी या पदासाठी अर्ज केला होता. त्यांच्यासह एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांनी अर्ज केले होते. मात्र, निवड समितीचे प्रमुख मनोज सौनिक यांनी रजनीश सेठ यांची निवड केली. यामुळं रजनीश सेठ यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे.