Home Health जागतिक महिला दिना निमित्त सोनार समाज सेवा संस्थेचा उपक्रम ; महिला मंडळी...

जागतिक महिला दिना निमित्त सोनार समाज सेवा संस्थेचा उपक्रम ; महिला मंडळी एकत्र येत महिला दिन साजरा..

46
Oplus_131072

गडचिरोली:- येथील सोनार समाज सेवा संस्थेच्या वतीने गडचिरोली महिला मंडळाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. यावेळी विविध मनोरंजक व कौशल्यवर्धक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात चमचा-गोळी, संगीत खुर्ची, वेशभूषा तसेच डान्स अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमावेळी समाजाच्या महिला अध्यक्षा अल्का खरवडे, महिला सचिव वृषाली हर्षे तसेच सविता डोमळे, दर्शना डोमळे, मायाताई भोजापुरे, प्रीती हर्षे, दीपाली नागरे, वैशाली भजने, मंजुषा पालकर, शालिनी भरणे, स्वेता भरणे, शुभांगी काळबांधे, वंदना हर्षे, जयश्री हर्षे, दीपाली हर्षे, कुमोद माटूरकर, लतिका काळबांधे, कल्पना काळबांधे, हेमलता हर्षे, रोहिणी हर्षे, कल्याणी हर्षे, मोनिका खरवडे, उज्वला काळबांधे, शारदा इन्कने, रागिणी डोमळे, रोशनी काळबांधे, स्मिता हर्षे, हाडगे काकू, पोगळे काकू आणि चेतना ढोमने आदी महिला उपस्थित होत्या.

महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांना एकत्र येऊन आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली तसेच आनंदी वातावरणात महिला दिन साजरा करण्यात आला.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.