वैरागड – महाशिवरात्री 2025 निमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र भंडारेश्वर मंदिर येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी, बुधवार, सकाळी 9 वाजता दुग्धमहाअभिषेक व त्रिशूल पूजन संपन्न होणार आहे.
तसेच, दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी, गुरुवार, सायंकाळी 4 वाजता महाहवनपूजन व गोपालकाला तसेच महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा, असे भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवार, वैरागड इलाका यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
महाभोजन कार्यक्रम:
स्थळ: बोलू भाऊ सोमनानी यांच्या घरासमोरील पटांगण, वैरागड
वेळ: सायंकाळी 6 वाजल्यापासून आपल्या आगमनापर्यंत
– आयोजक: भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवार, वैरागड इलाका