वैरागड येथील विराट राजाच्या किल्ल्यावर शितल सोमनानी यांच्याकडून प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन

19

वैरागड, 26 जानेवारी 2025: प्रजासत्ताक दिनाच्या शुभ प्रसंगी, ग्रामपंचायत सदस्य शितल सोमनानी यांच्या नेतृत्वाखाली वैरागड येथील विराट राजाच्या किल्ल्यावर झेंडावंदन समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात वैरागडच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या परिसरात उपस्थित नागरिकांनी देशभक्तीच्या जोशात झेंडावंदन केले.

वैरागड हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे आणि ते धार्मिक तसेच सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. येथील हेमानपंथी मंदिरं या गावाला एक वेगळी ओळख देतात. ग्रामपंचायत सदस्य शितल सोमनानी यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यांना एक समर्पित समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. “एक टक्का राजकारण, 99% समाजकारण” या तत्त्वावर आधारित त्यांच्या कार्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे.

या झेंडावंदन समारंभात ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. उपस्थितांनी शितल ताईंच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना आगामी कार्यकाळातही अशीच प्रगती घडवून आणण्यासाठी शुभेच्छा दिल्या.