व्हिडिओ पार्लर चा जुगार पुन्हा सुरु ‼️आणखी कीती लोकं कर्जबाजारी होणार? मनोरंजन च्या नावाखाली कोरा सातबारा ‼️

476

चंद्रपूर 27 जून –
💥व्हिडिओ पार्लर गेम चा जुगार आता शहर, रामनगर, आणि दुर्गापूर हद्धीत चालू होताच पुन्हा एकदा सुरु झाल्याने जिल्ह्यातील एकूण बारा दुकानें चालू झाल्याचे चित्र बगावयास मिळत आहे?
मनोरंजन च्या नावाखाली चालणाऱ्या या व्हिडिओ पार्लर च्या आड जुगाराचा डावपेच आखल्या जातं आहे?
👉
मुळात त्या वेळेस करमणूक कर अस्थीवात असताना त्याला करमणूक च्या नावाखाली परवाना दिला जायचा पण कालांतराने या करमवणूक कर च्या ठिकाणी आता GST लागू झाल्या नंतर त्याचा सातबारा चा कोरा झाला असताना, आता जिल्हाप्रशासनाने या व्हिडिओ पार्लर ला परवानगी कुठल्या आधारावर दिल्या गेली हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे?
👉 ज्या व्हिडिओ पार्लर च्या जुगाराने वरोरा शहरात तरुण युवकांला पैसे हरल्या नंतर रेल्वे समोर येऊन आत्महत्या करावी लागली, ज्या व्हिडिओ पार्लर नीं अनेक संसाराची राख रांगोळी केली असता कितीतरी लोकं कर्जबाजारी झाले अश्या त्या व्हिडिओ पार्लर ला पुन्हा चालू करण्यात कोणाचा कीती रस आहे हे येणारी वेळेस ठरवेल!