रेती साठाच शिल्लक नाही तर? कुलथा, विठ्ठलवाडा दोन्ही रेती घाटावर “रात्रीस खेळ चाले” ‼️

312

चंद्रपूर( 14 जुन)-
जिल्हा प्रशासनाने सलग तिसऱ्यांदा गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा आणि विठ्ठलवाडा या ठिकाणी शिल्लक रेती साठा उचलण्या करीता परवानगी दिली आहे.
शिल्लक रेती साठ्यांच्या नावाखाली नदीपात्रातूनमशीन लावत रेती चा उपसा करीत, रेतीमाफिया प्रशासनच्या डोळ्यात धूळ टाकत शिल्लक रेती साठा दाखवीत आहे?

जिल्हा महसूल प्रशासन, खनिखर्म विभाग आणि पोलीस विभागाने या कडे लक्ष दिल्यास खरेच शिल्लक साठा आहे का? की बनवाबनवी करून रात्रीस खेळ चालवला जातं आहे याचे खरे चित्र या ठिकाणी रेती घाटावर बिंग फुटत उघडकीस येईल!

गोंडपिपरी तालुक्यात उजेडात येत असलेल्या या रेती तसकरांना कुणाचे बळ लागत आहे,हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे! कुठल्या यंत्रनेला कुठल्या प्रकारे आर्थिक आमिष देऊन हा रेती तसकरीचा डाव रचल्या जातं आहे हा सामान्य जनतेला महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे?

जिल्ह्यातील महत्वाचा घाट मानल्या जाणाऱ्या कुलथा आणि विठ्ठलवाडा या दोन्ही घाटावर चंद्रपूर आणि राजुरा येथील मोठया व्यवसायाकांनी आपले धोरण राबवित प्रशासनाला शिल्लक रेती साठ्या च्या नावाखाली T. P. ( ट्रान्सपोर्ट परमिशन )ला जिल्हा प्रशासना कडून परवानगी घेतली आहे.

मात्र मुळात स्टॉक शिल्लक नसताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यावर काय मेहेरबानी करीत आहे? याचे गौडबंगाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.मुदतवाढ़ दिलेली शिल्लक रेतीसाठ्याची 15 दिवसाची परवानगी हे घाट धारकांना नक्कीच लाभदायक जरी असले,पण मात्र शिल्लक साठा कुठे आणि कसा याचा शोध प्रशासनाने नक्की घ्यावा!
दिलेल्या परवानगी पेक्षा या दोन्ही घाटावर अधिक प्रमाणात उत्तखंनं केले गेले असताना मात्र त्याकडे अद्याप कारवाई चा फास आवरण्यात आला नाही आहे?

ओव्हरलोड वाहतूक असो की अवैध उत्तखंनं यावर पोलीस प्रशासनाने सुद्धा तितकीच जवाबदारी पार पाडावी ही सर्व सामान्य जनतेची हाक आहे.

गोंडपिपरी पोलीस स्टेशन च्या हद्धीत चालणाऱ्या या दोन्ही रेती घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीघाट धारकांच्या बोंबा येत असताना त्यावर आवर घालणे आवश्यक आहे.
कुलथा येथील रेती घाटावर याआधीही गावकरी आणि रेती माफिया मध्ये खुनी संघर्ष झाला असताना ज्या घाटाला प्रशासनाने बंद करायला हवे?
त्याच घाटावर आणखी मुदतवाढ़ देने बंधनकारक आहे का? हा सध्या प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील राजकीय बड्या नेत्याचे आश्रय घेत दारू तस्करी करणाऱ्या एका पदाधिकाऱ्यानेही या ठिकाणी रेती तस्करी आणि दारू तस्करीचा धुमाकूळ घातला आहे!
या राजकीय पोळी शेकणाऱ्याला नेत्याला या धंध्यातील राजकारणाला “अमर” अमृत तर दिले नाही न याचे सर्वाना आश्चर्य वाटत असताना याला अभय का आणि कुणाचे आणि याचे देणगीधारक कोन? हे लवकरच डेली पोस्ट मार्टम या संधर्भात राजकीय वृत्तीतले दारू माफिया तस्कर या मथळ्या खाली वृत्त प्रकाशित करणार आहे.