चंद्रपूर -( 9मे ) बांधकाम नियमाचे कागदावरच घोडे नाचवणाऱ्या चंद्रपूरातील एका बार व्यवसाय काने चंद्रपूर – गडचिरोली च्या सीमेवर वैनगंगा नदीजवळ “हाय वोल्टेज इलेक्ट्रिक “लाईन च्या खालती इमारती चे बांधकाम करून चक्क “बार”परवाना घेतल्याचे उघडकीस आले आहे.
नियमानुसार किमान हाय वोल्टेज लाईन च्या 100मीटर अंतरापर्यत कुठल्याही बांधकाम ला परवानगी देण्यात येत नसताना मात्र या व्यवसायाकाने चक्क त्या लाईन च्या खालतीच दुमजली इमारत उभी करीत बार खोलला आहे.
कागदोपत्री नियमात घोडे नाचवत परवानगी दाखवत या बांधकामाला परवानगी देणारे “ते ” कौन हा प्रश्न सध्या विचारला जातं आहे?
ज्या हाय वोल्टज इलेक्ट्रिक लाईन च्या खालती हा बार थाटण्यात आला आहे. त्या जागेचे अकृषक (N. A)करीत बांधकामा साठी MSEB तर्फे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते? तेही प्रमाणपत्र या बांधकामसाठी नियमात बसत नसताना साध्या घराला ही बांधकामची परवानगी नाही मिळत तर या बांधकामाला परवानगी देण्यात कशी आली या बाबत आता थेट प्रश्न विचारना त्या अधिकाऱ्यांना करण्यात येत आहे.
hw-remosaic: 0;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: 32768;
cct_value: 5128;
AI_Scene: (6, -1);
aec_lux: 143.0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;
भविष्यात या हाय टेनशन लाईन मुळे जर कुठला मोठा घात झाला तर त्यास कोन जवाबदार राहणार हा चिंतेचा विषय बनला आहे?
गडचिरोली शहर नजदिक असल्याने या बार मध्ये नेहमीच दारु शौकीनांची गर्दीच असते. अगदी सीमेवर असलेल्या या दारुविक्रेत्याला स्वतःच्या फायद्या करीता नागरिकांचा जीव तर धोक्यात टाकायचं नाही न? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे?
“सरोवर बार अँड रेस्टॉरंट ” च्या नावाखाली चालणाऱ्या या बारचा मालक चंद्रपूरातील मद्धसम्राट नावाने ओळखला जातो?
या बारमालकाचे वाईन शॉप तसेच अनेक बार ही आहे. याच्याच आणखी काही बार मध्ये ही नियमांना डावलेले गेले असताना साठेलोटे चे पाणी कुठे मुरले आहे ते अद्याप कळले नाही?
नियमांना चौकटीत बसवणारे माहीर कलावंत या बार धारका जवळ असल्याचे बोलल्या जाते.
साध्या घरकामासाठी बांधकाम परवानगी घ्यायची असेल तर फाईल चा गठ्ठा बनवून सामान्य नागरिक नियम लावून फिरत असतो,मात्र डोळ्यादेखत बांधकाम करून हाय वोल्टज बार थाटणाऱ्या या दारू व्यवसायकाचे हाय वोल्टज संबंध एक दिवस नक्कीच या हाय वोल्टज लाईन चा 440 करंट घेऊन नागरिकांना झटका लावणारा आहे?
मुळात ज्या ठिकाणी बांधकाम करून बार थाटून स्वतःच्या स्वार्थसाठी ज्या अधिकाऱ्यांनी भोंगळ कारभार करत नां हरकत प्रमाण पत्र दिले त्यांच्यावरही लवकरच गदा येणार आहे.