जर हे नसेल न….बार परवाना रद्द होणार!

416

चंद्रपूर -8 जून( सुशांत घाटे )
जिल्ह्यातील ज्या दारूच्या दुकानांना लायसन्स, अटी आणि शर्ती वर दिल्या गेले, मात्र त्याचे काटेकोपणे पालन करणे आवश्यक असताना त्यात अनेक त्रुटी आढळून येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे येत आहे.

ज्या “बार “धारकांना रेस्टॉरंट च्या फूड लायसन्स वर परवाना दिला जातो,तो मात्र फक्त नावारूपी असल्याचे जिल्ह्यातील अर्ध्या अधिक बार च्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
अन्न औषधन प्रशासन विभागाचा च्या लायसन्स नंतर च दारू दुकानाचा परवाना प्राप्त होत असतो.
रेस्टॉरंट असणे आवश्यक असताना ते बंद अवस्थातच असल्याचे अनेक बार आणि परमिट रूम ला पाहायला मिळत आहे.

एखाद्या वाईन शॉप आणि बियर शॉपी सारखेच काही बार धारक याला चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे?
जिल्ह्यातील 700 बार धारकांना लायसन्स असताना यातील अर्धे बार ला नावाचा फूड परवाना दिला गेला असल्याचा प्रकार दिसत आहे.
जर त्या ठिकाणी रेस्टॉरंट च अस्तिवात नसेल तर त्याचे” बार “लायसन्स चा ही परवाना रद्द होऊ शकतो.

नावासाठी किचन लिहून ठेवणारे अनेक बार मध्ये मेनू कार्ड तर सोडा साधा पापड ही मिळेनासा झाला आहे यांचे फूड च नाही तर बार चे नियोजन कसे करतात असा प्रश्न उभा झाला आहे.
. अनेक ठिकाणी रेस्टॉरंट मध्ये फूड ची चांगली क्वालिटी नसताना त्यांचा फूड प्रशासन ने त्यांना चेक अप करणे गरजेचे आहे. काही रेस्टॉरंट मध्ये अस्वच्छतेचा तसेंच दुर्गंधी तसेच उघड्यावर असणाऱ्या बार अँड रेस्टॉरंट ची तपासणी करत त्याचे लायसन्स रद्द करणे आवश्यक आहे.
जर त्याचा फूड परवाना च रद्द झाला तर कायद्याने त्याचा बार सुद्धा पाच मिनीटांनात बंद होतो.काही दिवसा अगोदर, जिल्हा प्रशासनाने दारू विक्रेत्यांचा क्लास घेऊन अटी शर्ती चे पालन करण्याच्या सूचना दिल्या असताना आता जरा अन्न औषधन प्रशासनाने जागृत होऊन यांचे रेस्टॉरंट आहे की नाही आणि त्याची फूड क्वालिटी ची तपासानी करावी जेणेकरून कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल त्यांना योग्य सल्ला मिळेल!