हिस्ट्री विथ विक्ट्री… काँग्रेस च्या प्रतिभा चा विक्रम ..2 लाख 58340 मतांनी राज्याच्या हेवी कॅबिनेट मंत्र्याचा पराभव! भाजप चा विदर्भात सुपडा साफ.. एक जागेवर समाधान..

648

चंद्रपूर /वणी/आर्णी (5जुन) सुशांत घाटे –
लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकाला ला बघता महाराष्ट्र राज्यात महाआघाडीला जणू बहुमत च मिळाले की काय असेच चित्र पाहायला मिळाले.

र्चा होती ती विदर्भातील चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीची पक्षातर्गत चाललेली,गटबाजी आणि शेवटपर्यंत काँग्रेस तर्फे लोकसभेच्या तिकीट साठी चाललेला घटनाक्रम याने अनेक कार्यकर्ते सोबत नेते ही चकरावून गेले होते.
संधी चे सोने करण्याची हेच ते वेळ होती!
दिवंगत बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांच्या अर्धांगिनी यांची काँग्रेस हायकामांड तर्फे लास्ट मोव्हमेन्ट वर हिरवा कंदील देत पक्षाने तिकीट दिली,
राजकारणात कुठलाही मोठा अनुभव नसताना विद्यमान आमदार च्या रूपात असणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांची थेट राज्याच्या हेवी कॅबिनेट मंत्र्याशी लढत होती.
चंद्रपूर – वणी- आर्णी लोकसभा निवडणुकीत जवळपास 67%मतदान झाले असताना दोन्ही पक्षांच्या उमेदवारानी या लोकसभा क्षेत्रात आपले चाणक्य फिरवले!

राज्याच्या मुख्य प्रवाहात असणारे कॅबिनेट “मंत्री” सुधीर मुनगंटीवार यांचा 2लाख 58 हजार 340 मतांनी राज्यात काँग्रेस च्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील प्रतिभा धानोरकरांनी दारुण पराभव करत राज्यात विश्व विक्रम केला आहे.
मागील निवडणुकीत दिवगंत खासदार बालू उर्फ सुरेश धानोरकर यांनी केंद्रातील मंत्री हंसराज अहिर यांचा 37000 मतांनी पराभव करत महाराष्ट्रात काँग्रेस ची गरिमा वाचवली होती. चंद्रपूर लोकसभा हीच एक सीट महाराष्ट्रात काँग्रेस च्या हाथी होती
आज तीच परिस्थिती बघता यावेळेस त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभा धानोरकर यांनी थेट राज्याच्या हेवी खात्यातील मंत्र्याला दारुण पराभव करीत “हिस्ट्री विथ विक्ट्री” केली आहे.

मतमोजणी ला सुरवात होताच पिक असा होता की जणू बुलेट ट्रेन सारखेच मताचे कल काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर यांना स्पीड नी फ्रंट फूट वर आणत होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे बल्लारशाह विधानसभा क्षेत्रातून सुद्धा ज्या ठिकाणी भाजप चा गड मानला जाचा त्या ठिकाणी भाजप ला 50000मतांनी बॅकफुट वर आणले. राजुरा, कोरपना, मुल, गोंडपिपरी, चंद्रपूर, दुर्गापूर, वणी, भद्रावती, वरोरा घुघूस या ठिकाणी काँग्रेस ला दमदार साथ मिळाली.मागील आणि आता च्या दोन्ही निवडणुकीत भाजप च्या दोन्ही मंत्राचा पराभव म्हणजे “पब्लिक मीटर “नी दिलेला कल आहे. जल्लोषात प्रतिभा यांचा विजय हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळात काँग्रेस ची येणारी भक्कम लाट च मनावे लागेल.
घटक पक्षांनी घेतलेली जवाबदारी आणि त्यांची कार्यप्रणाली ही धानोरकर यांच्या विजयाचे विशेष स्मारक आहे. राज्यात या लोकसभा क्षेत्राची नामचिन चर्चा रंगत असताना प्रतिभा धानोरकरांची” हिस्ट्री विथ विक्ट्री “झाली आहे.