चंद्रपूर /पुणे (23 मे )सुशांत घाटे –
पुण्यातील कल्याणीनगर भागात अतिवेगाने गाडी चालवत, अल्पवयीन मुलाने दुचाकीवरील दोन अभियंत्यांना उडवले त्यात दोघांचाही घटना स्थळीच मृत्यू झाला. हा अल्पवयीन मुलगा “दारू “च्या नशेत असल्याचे खातरजमा झालेल्या, बार नी शहानिशा न करता दारू कशी पुरवली यावर पुणे जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलत पुणे शहरासह जिल्ह्यातील 32″परमिट”रूम आणि बार चे परवाने रद्द केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
पुणे जिल्हा प्रशासन कारवाई करत असताना चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला याचा विसर पडला दिसतोय!
तक्रारी वर तक्रारी देऊन सुद्धा जिल्हाधिकारी विनय गौडा आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या वर मौन धारण करून बसले आहे?
जिल्ह्यात नियमाला डावलून अनेक बियर बार ना परवानगी देत “करोडो”रुपयाचा चा आर्थिक तडजोड करत
” हिरवा कंदील”
दारू च्या दुकानाला देण्यात आला. कुठलीही शहानिशा न करता बनवलेल्या कागदाच्या आधारे घर बैठे अभियान करत राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभागाने डोळे झाक करत ना हरकत प्रमाण पत्रे दिली आहे!
चंद्रपूर शहरात ज्यांच्या कडे पार्किंग नाही त्यांनाही बार चे परवाने देत घरामध्येच बार उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नियम कसे बरोबर आहे? हे दाखवत हिरवा कंदील देणाऱ्या तिन्ही विभागानी खिशे भरत दारू परवाण्यावर हस्थाक्षर दिले आहे?
चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा हे जिल्ह्यातील प्रमुख स्थानावर असताना सुद्धा त्यांना साधा त्याअभ्यास करता आला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल?
अगदी रोड च्या बाजूला लागून असलेल्या चंद्रपूर मूल मार्गांवर असलेल्या लोहारा येथील हॉटेल व्यवसायाकिनी अक्षरशः नियमांचे तीन तेरा केले असताना सुद्धा प्रशासन हतबल होऊन बसला आहे?
रोज कितीतरी या महामार्गांवर अपघात घडत असताना सुद्धा जिल्हा प्रशासनाला तसेच पोलीस विभागालाही कारवाई चे अद्याप सूत्र च मिळाले नाही हे शोकांतिका म्हणावे लागेल?
जिल्ह्यातील बल्लारपूर महामार्ग, कोठारी, गोंडपिपरी या भागात तर रोड वरती एक दिवसा आड अपघात होऊन मृत्यूमुखी पडल्या च्या कितीतरी, वार्ता कानावर येत असताना मात्र खिसा भरून मुकदर्शक बनलेला विभाग सध्या पचनक्रिया करीत आहे?
जिल्ह्यात सुसाट वेगाने एकावर एक दारू चे परवाने देणाऱ्या कोणत्या एकाचा हाथ नसून ही दारू चे परवाने वाटणारी मोठी चैन च म्हणावे लागेल!
मुख्य बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने चक्क एकाच रात्री 37 दारू च्या परवाण्यावर रात्री आठ वाजता येऊन फाईल सही करत प्रत्येक परवान्याचा हिशोब घेत बॅग भरून पैसे गोळा केले असल्याचे विश्वसनीय माहिती डेली पोस्ट मार्टम ला तेथील च एका कर्मचाऱ्याने दिली आहे!
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन लाचखोर अधिकारी सध्या निलंबित आहे. भ्रष्टाचार च्या आहारी जाणाऱ्या तसेच कायद्याला डावलून स्वतःच्या फायद्यासाठी आर्थिक धोरणातून करोडो ची माया जमवणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासन तसेच पोलीस विभागातील ही भ्रष्टाचार मध्ये लिफ्त असणाऱ्या ची SIT चौकशी लावण्याची मागणी सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.
जिल्ह्यात ब्रम्हपुरी, नागभीड, मूल, सावली, गोंडपिपरी, सिंदेवाही, तळोधी बाळापूर, वरोरा, भद्रावती, राजुरा, गडचांदूर, चिमूर, भिसी, शेगाव, टेम्भूरडा, खामबाडा, कोरपना, वीरूर, धाबा, कोठारी, घुघूस, पडोली, चिंचपल्ली, लोहारा, नवरगाव, पाथरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियमाला डावलत अनेक बियर बार, बियर शॉपी व्यवसाय थाठत अपघाताला तसेच अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन देत आहे!
जर याची समतोल तपासणी साठी एक टीम तैयार केली गेली तर 80% बार आणि शॉपी या बंद होऊ शकतात? आर्थिक देवाण घेवाण करून सध्या यांचा धंधा राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन च्या मेहेरबानी दिवे लावत आहे!
जिल्हा प्रशासनाच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची ही ED तसेच CBI मार्फत चौकशी करणे गरजेचे आहे. करोडो रुपयाची आर्थिक देवाण घेवाण करत हिरवी फित देणाऱ्या अधिकारी ला आता लाल फिती ची गरज आहे? पुणे जिल्हा प्रशासन जागु शकतो तर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला का जाग येत नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे!