दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत रेती तस्क रांच्या मुसक्या आवरल्या!

509

चंद्रपूर 11 may – रोज रेती तसकरांना जिल्ह्यात पोलीस विभाग पकडत पकडत असताना, मात्र जिल्ह्यातील रेती तस्कर काही आवरे नासे झाल्याचे चित्र दिसत आहे?

फक्त कागदोपत्री कामात विखूरलेल्या या महसूल यंत्रनेचे फाईल वजनी काम फक्त कार्यालयातच पाहायला मिळत आहे मात्र पोलीस विभागातील काही अधिकारी दिवस रात्र रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम करीत आहे.

काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या हद्धीत कुठलीच अवैध काम चालणार नाही याची स्वतः दक्षता घेत,त्याची अंमलबजावणी करण्याचे सूत्र हाथी घेतल्याचे पाहवयास मिळाले आहे.

अश्याच एका गोपनीय माहितीवरून बल्लारपूर चे ठाणेदार आसिफ राजा यांनी स्वतः रात्री विसापूर येथे धडक देत वर्धा नदी च्या पात्रातून रेती चा उपसा करत ट्रॅक्टर मध्ये रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरांना मोठ्या शिता फतीने पाठलाग करीत ताब्यात घेतले असल्याचे काल मध्य रात्री पाहायला मिळाले.
रात्र भर शेत शिवारात दबा भरून बसलेले पोलीस उपनिरीक्षक चाटे आणि हेड कॉन्स्टेबल गजानन डोईफोडे यांनी शेत शिवारातून रस्ता गाठत,

दोन पळून जाणाऱ्या रेती च्या ट्रॅक्टर चा पाठलाग केला असता दोघांच्याही धावण्यात कोलाटण्या झाल्या त्यात त्यांना दुखापत ही झाली, मात्र जीवाची बाजी लावत 15-20रेती माफियाच्या तावडीतून त्यांनी दोन रेती भरलेले ट्रॅक्टर जब्त करीत पोलीस स्टेशन ला आणले.

तर बल्लारपूर ठाणेदार आसिफ राजा ने ही याच नदीपात्रातून पळालेल्या ट्रॅक्टर चा स्वतः रात्री शोध घेत त्याला हुडकून काढले आणि त्यावर सवारी करीत पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे आणले!

रात्री बेरात्री आपल्या कर्तव्याची जाणीव ठेव्हत या ठाणेदाराची जरा कामाची स्टाईल च वेगळी आहे? जिल्ह्यात अनेक पोलीस स्टेशन च्या हद्धीत
अद्याप ही “कंट्रोल विथ सेट फार्मुला “सुरु असताना मात्र बल्लारपूर येथे ” ऍक्शन विथ कंट्रोल ” हा फार्मुला प्रसिद्धी झोतात हिट ठरत आहे.

25 लाखाच्या मुद्देमालासह चार आरोपीना बल्लारपूर पोलिसांनी अटकेत घेत गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पांडे, पोलीस उपनिरीक्षक चाटे, हेड कॉन्स्टेबल गजानन डोईफोडे, वाहन चालक वामन शेंडे यांनी केली आहे.