अँटी करप्शन चा मोठा षटकार ‼️ एक लाखाची लाच घेणाऱ्या एस पी सहित दोन कर्मचारी जाळ्यात?

4074

चंद्रपूर 7 मे – अँटी करप्शन विभागाने जिल्ह्यातला सर्वात मोठा मासा आणि त्यांच्या सहकार्याला ट्रॅप केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जयसिंग पाटील, एक्ससाईझ ग्रामीण चे उपनिरीक्षक चेतन खारोडे दुय्यम अधिकारी तसेच अभय खाताड कार्यालय अधीक्षक यांना 130000 रुपयाची लाच घेण्याच्या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून एक लाख रुपयाची लाच घेताना दुय्यम अधिकारी आणि कार्यालय अधीक्षक यांना रंगे हाथ अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी हे गोदावरी बार घुघूस चे मालक असून त्यांना बियर शॉपी करीता नवीन परवाना मिळण्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रा
ज्य उत्पादन विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्या सहमतीने ही लाच मागितल्या गेल्याची पुष्टी झाल्यावर त्यांच्या वरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. संजय पाटील यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या अनेक तक्रारी केल्यानंतर ही त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नसताना थेट अँटी करप्शन विभागाने मुसक्या आवळल्या आहे. सध्या पाटील हे फरार असून अँटी करप्शन विभाग त्यांच्या मागावर असल्याचे सांगण्यात आले आहे.