चंद्रपूर 25 एप्रिल – जिल्ह्यात अवैध धंद्याना आळा घालत असताना जिल्ह्यात सुंगधित तंबाखू चा व्यापार करणाऱ्या वर पण पोलिसांची वक्रदृष्टी अद्याप सुरूच असून नुकताच स्थानिक गुन्हे शाखेने भद्रावती नजीक घोडपेठ येथे सुंगधित तंबाखू ची खेप पकडली?
निवडणुकीच्या काळात पोलिसांची या व्यवसायावरून जरा अतिरिक्त कामाचा ताण आणि सतत चे बंदोबस्त या मुळे थोडे लक्ष भटकले असता अनेक व्यापाऱ्यांनी सुंगधित तंबाखू ची चांगलीच तस्करी केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, ब्रम्हपुरी, वरोरा, सावली,चंद्रपूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सुंगधित तंबाखू ची साठवणूक करून हळू हळू विक्री करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी कितीही कारवाई केल्या मात्र न जुमननारे अनेक अनेक तरुण वर्ग आता रेल्वे नी सुंगधित तंबाखू चा व्यवसायात गुंतले आहे.