चंद्रपूर (25 एप्रिल )- पोलिसांची कितीही जुगारावर करडी नजर असली तरी मात्र जुवारी आपले अड्डे बनवत पत्ते पिस्सिंग पिस्सिंग करत जुगाराचा डाव खेळतच असतात. रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत इंदिरा नगर येथे दुमजली इमारतीत गेल्या सहा महिन्यापासून रम्मी गेम चा डाव सजत असून पोलिसांना याचा ठांग पत्ताच नाही?
12-14जुवारी या ठिकाणी दुपारी 12वाजतपासूनच हजेरी लावत रात्री 12पर्यंत जुगार खेळत असतात. यांच्या सेवेसाठी दुपारी चहा, नाश्ता, कोल्ड्रिंक आणि रात्री फर्माईशी नुसार ऑर्डर घेत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे?
या जुगाराला बिनदिक्कत चालवाणारे देवा आणि राकेश यांची जोडी या जुगाराला चालना देत,पोलिसांच्या नाकावर निंबू टोचून गेल्या सहा महिन्यापासून लाखोचा जुगार भरवत आहे! जुगार भरविनारा कुणाच्या मदतीने इतकी हिम्मत करीत हे पडद्या आड आहे. यातील एकाचा भाऊ चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे? रामनगर पोलिसांनी जंगल भागातील अनेक जुगारावर जीवाची बाजी लावत जुगार पकडले असताना मात्र त्यांना इंदिरा नगर येथील देवा – राकेश च्या सुरु असणाऱ्या बंद खोलीत चालणाऱ्या जुगाराला पकडता काय येईना हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या आधीही तारांकित हॉटेल मध्ये सुरु असणाऱ्या जुगारबाबत बातमी प्रसारित होताच हॉटेल चालकांनी जुगाराला बंद केले होते! हे विशेष.