चंद्रपुरात वादळ वाऱ्याचे थैमान; अवकाळी पावसाने झोडपले!

1112

आज चंद्रपूर शहरावर अचानक वादळाचा कहर कोसळला. तीव्र वादळी वाऱ्यांनी, विजेच्या कडकडाटाने आणि मुसळधार पावसाने शहरात प्रलयकालीन परिस्थिती निर्माण झाली. तुकूम परिसरात तर काळोख निर्माण झाला आणि वादळाचे अत्यंत भयानक रूप दिसून आले. या वादळामुळे संपूर्ण शहर चिंब चिंब भिजले आणि काही वेळासाठी तर पूर्णपणे थंडावले.

अनेक नागरिकांना घरातून बाहेर पडणे अशक्य झाले आणि त्यांनी घरातच आसरा घेत वादळाचा तडाखा सहन केला. वादळामुळे काही झाडे उन्मूलन झाली आणि वाहतुकीवरही परिणाम झाला. सुदैवाने या वादळात कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नाही.

 

हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवासा टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.