चंद्रपूर (9 एप्रिल) -जिल्ह्यात पोलीस प्रशासन च्या नावाला काळिमा फासणाऱ्या बलात्कारा च्या गुन्ह्याखाली अटक झालेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जमादार संजय अतकुलवार याला सहकार्य करीत असणाऱ्या या गुन्ह्यात आणखी दोन कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा धक्कादायक खुलासा पीडित महिला ने आज पत्रकार परिषद घेत केला आहे.
पोलीस प्रशासना समोर LCB च्या संजय अतकूलवार यांच्या सोबत(त्या वेळेस स्थानिक गुन्हे शाखे मध्ये कार्यरत )LCB च्याच कुंदन सिंग बावरी आणि प्रांजल झिलपे यांच्यावरही पीडित महिलेने गंभीर आरोप केले,असताना पोलिसांनी अद्याप यांच्यावर कुठलाही गुन्हा नोंद न झाल्याने पीडितीने पत्रकार परिषद घेत मोठा गोप्यस्फोट केला आहे.
LCB चा कर्मचारी संजय अतकूलवार जेव्हा जेव्हा शारीरिक संबंध बनवन्यास येत होता,त्या वेळेस हे दोघेही त्या सोबत पाठराखण करीत त्याला संपूर्ण सहकार्य करीत असल्याचा आरोप पीडितीने केला आहे. ज्या दिवशी पीडितीने रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली त्याच्या च दुसऱ्या दिवशी LCB च्या त्या दोन कर्मचाऱ्यांनी पीडितीच्या घरी जाऊन धमकावल्या चा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासन या दोन्ही आरोपीचे बचाव करत असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करीत न्याय देण्याची मागणी पीडितीने पत्रकार परिषद घेत केली आहे.