चंद्रपूर- (3एप्रिल )स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्या वर रामनगर पोलीस स्टेशन येथे एका माहिलेच्या शारीरिक शोषण प्रकरणी बलात्कार चा गुन्हा दाखलं झाल्याने पोलीस खात्यात मोठी खळबळ माजली आहे.
गेल्या वर्षभरापासून आपले शारीरिक शोषण हा कर्मचारी करत असल्याचा ठपका ठेवत गंभीर आरोप या महिलेने स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असणाऱ्या संजय अतकूलवार याच्यावर केला आहे.
पीडित महिला काल रात्री रामनगर पोलीस स्टेशन गाठून आपली फिर्याद नोंद्वत होती. पीडित महिलेच्या पतीला मदत (एका गुन्ह्या संधर्भात )करण्याच्या आशेवर गेल्या वर्षभरापासून शारीरिक शोषण केले असल्याचेआरोप तिने केले आहे. पीडित महिलेला एक मुलगी असून खुद्द तिचा पती सुद्धा तक्रार देण्याच्या वेळेस रामनगर पोलीस स्टेशन ला उपस्थित होता, रामनगर पोलिसांनी LCB च्या संजय अतकूलवार यांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्या चा तपास चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव करीत आहे.