चंद्रपूर (24 मार्च )-तपतपत्या उन्हाळाच्या चाहूलीमध्ये, कर्तृत्वाचा ठसा
उमटवत आपले दायित्व निभावणारी वाहतूक शाखेची ती महिला कर्मचारी म्हणजे *रणरागिणी* च म्हणावे लागेल. आज दुपारी *सावरकर* चौकात वाहतूक *ड्युटी* वर असणाऱ्या *रीना* *राडे* नेहमी प्रमाणे आपल्या *टप्प्यावर* हजर होत्या, वाहतुकीचे काटेकोर पालन व्हावे या करीता सज्ज असताना एक *दुचाकी* चालक भरधाव वेगाने *ट्रिप्पल* सीट येत *असल्याचे* पाहून लगेच वाहतूक शिपाई *रीना *राडे आपल्या टप्प्यावरून समोर सरकल्या, वाहतुक शिपायी बगताच त्या दुचाकी वरून दोन जणांनी काढता पाय घेतला व तो दुचाकी चालक भरधाव वेगाने गाडी काढण्याचा प्रयत्न करीत असताना, सळसळत्या उन्हात रीना राडे नी कुठलीही पर्वा न करता आपली धाव दुचाकी च्या दिशेने घेत त्यास *अडवले* . ते ही दुचाकीच्या समोर गाडी चालवत असताना.
*विशेष* म्हणजे एरव्ही ट्रॅफिक विभागाच्या शिपाई, सिग्नल तोडणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, ड्रॅंक अँड ड्राईव्ह या कारवाई करीत असतात, पण एखाद्या महिला शिपाई ची इतकी *धावपळ* पाहून किमान तिची कामगिरी ची दाद देने गरजेचे आहे. वाहतूक शाखेच्या *कर्तव्यदक्ष* महिला कर्मचारी *रीना* *राडे* यांचे कौतुक केल्यास वावग नाही.