ब्रेकिंग न्यूज 💥💥💥💥SP सुदर्शन नी स्वतः दिला दणका ‼️

1611

चंद्रपूर 20मार्च (सुशांत घाटे )- मूल तालुक्यातील गोंडसावरी गावा लगत असलेल्या नदी पात्रातून रेतीचा उपसा करणाऱ्या तीन हायवा, पोकलेन मशीन सोबत एक बोलेरो वाहनाला काल रात्री तीन वाजताच्या सुमारास स्वतः पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तीन किलोमीटर अंतराची पायपीट करून मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही पहिली कारवाई स्वतः केल्याने आता थेट त्यांचे चक्र अवैध व्यवसायावर चालल्या ने पोलीस खात्यात आणि रेती माफियात खळबळ माजली आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी साध्या ड्रेस मध्ये वेषांतर करून खाजगी वाहणाने गुप्त माहितीच्या आधारे मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोंडसावरी येथे अवैध रेती च्या तस्करीला चाप लावत सहा आरोपीना घटना स्थळी पकडले.पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रनेलला या आधीच कारवाई संधर्भात सूचना दिल्या होत्या, मात्र अपवाद असलेल्या पोलीस यंत्रनेला ते आता स्वतःच हाथाळणार असल्याचे या धडाकेबाज कारवाईने इशारा दिला आहे? अवैध व्यवसायाला पाठबळ देणाऱ्याना हा सावधान तेचा इशारा समजावे लागेल? पुढील कारवाई मूल पोलीस स्टेशन करीत आहे.