रेस्टो अँड बार च्या नावाखाली हुक्का पार्लर वर रेड ‼️‼️

1921

चंद्रपूर 16मार्च -“आज की रात कुछ होने का है रे बाबा… म्हणत डी जे च्या तालावर नाचणाऱ्या आणि कर्कश आवाजात आपले नृत्य करत धानगड धिंगाणा घालत मद्धयाचे पेले पेत, निरनिराळ्या प्रकारे हुक्का ओढणारे तरुण मुले-मुली चा वर्ग ठिकाण्यावर येऊन (शनिवार) saturday नाईट चा गाजवाजा करत जल्लोष करतात? पोलिसांना याची चाहूल लागताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी स्वतः या हुक्का बार पार्लर चा आज कडक समाचार घेतला, हुक्का बार ची कुठलीही परवानगी नसताना हुक्के या ठिकाणी फुकले जातं असल्याची गोपनीय माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चालणाऱ्या N.D आणि ठिकाणा या बार वर त्यांनी रेड केली असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक युवक युवतीना त्यांनी ताब्यात घेत कारवाई सुरु केली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे सध्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अवैध धंध्यावर चक्र फिरत असताना शहरातील चालणाऱ्या हुक्का पार्लर वर कारवाईला dysp सुधाकर यादव यांनी स्वतः धडक दिली असल्याचे समजत आहे. पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.