“आमदार किशोर च्या जिभेला पागल ची बोलभाषा ” आशा वर्कर संतापल्या; CM बाय बाय करत रवाना

1505

“आमदार किशोर च्या जिभेला पागल ची बोलभाषा ”

आशा वर्कर संतापल्या; CM बाय बाय करत रवाना

चंद्रपूर (13मार्च )- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डन चे उदघाटन तसेच महानगर पालिका च्या विकास कामा संधर्भात भूमिपूजन आणी लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती होते.याच दरम्यान रात्री अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी त्यांनी सद्धीच्या भेट देण्याचा कार्यक्रम पण आखला होता. याच वेळी चंद्रपूरातील आशा वर्कर पण आपल्या प्रलिबिंत मागण्या संधर्भात आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवास स्थानी पोहचल्या, मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणी नागरिकांची गर्दी यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांना भेटावयास नाही मिळाले. त्यामुळे महिलांनी स्थानिक आमदाराकडे भेटण्याचा आवाज लगवला, मात्र आमदारांनी आशा पागल आहे असे उदगार काढल्याने आशा वर्कर चांगल्याच संतापलेल्या अवस्थेत पाहवयास मिळाल्या. आमदाराला अशोभनीय भाषा व त्यांच्या वर्तनाचा त्यांनी कडाडून विरोध दर्शवला, करोना काळात स्वतःचा जीव लावत आशा वर्कर नी दिवसरात्र भरीव योगदान दिले. शासनाच्या उदासीन धोरणाची त्यांना, जाणीव करून देण्यासाठी चांदा ते बांदा पर्यंत त्यांचा अद्यापही आंदोलनाचा प्रवास सुरुच आहे.मात्र आमदार किशोर जोरगेवार च्या “जिभेला पागल ची बोलभाषा… ” च म्हणावे लागेल.

 

 

……काय म्हणाल्या आशा वर्कर!

आम्ही आमच्या मागण्या संधर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यास आलो होतो, मात्र मुख्यमंत्री शिंदे यांना लोकांना बाय-बाय करत च समाचार घेतला, आमच्या मागण्या संधर्भात भेट न घेऊ देणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार ची “आशा पागल आहे “”ही भाषा अत्यंत अशोभनीय आहे, त्यांना त्यांची जागा लवकरच दिसेल.

 

चंद्रपूरातील आमदार किशोर जोरगेवार सध्या एकनाथ शिंदे गटात आपले स्थान मांडून आहे. त्यांचा 200युनिट मोफत बिजली देण्या संधर्भात कुठलाच ठोस निर्णय गेल्या चार वर्षात राज्य सरकार ने घेतला नाही. चंद्रपूर च्या जनतेने ज्या” नाऱ्या “च्या भरोशावर त्यांना हजारो मताधिक्याने जिंकून दिले त्याच जनतेला फक्त सांस्कृतिक कार्यक्रम दाखवण्यात येत आहे. बॅनर, पोस्टर ची सध्या जणू दोन आमदारा मध्ये झुंज च लागल्याचे दिसत आहे. जनतेच्या विकासातील मूलभूत, पायाभूत गरजा ह्या दूरच सावारल्या गेल्या चे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात ज्यांनी विरोध केला त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचे असले प्रकार सध्या दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या आणी स्वतःच्या अस्थीतवाच कीती मोठं स्थान आहे हे दाखवण्याचा कीर्तीमान सुरु आहे.मात्र आमदाराच्या त्या शिवराळ भाषेने सध्या आशा वर्कर चा पारा चढला आहे.