BREAKING NEWS
चंद्रपूर-(8मार्च )नागपूर वरून सुसाट वेगाने भद्रावती च्या दिशेने येणारी मारुती इंगनीस चारचाकी वाहन सकाळी 6:30वाजताच्या सुमारास कोंडा नाल्यात कोसळले. वाहन कोसळताच वाहनाला आग लागली,या आगीत चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. वाहणाचा ताशी जवळपास 120-130 असल्याचे सांगण्यात येत आहे. अंदाजे 35वयोगटातील पुरुष असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या युवकांची ओळख पटली नसून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.