ब्रेकिंग न्युज **चंद्रपूर ACB चा चौकार ‼️नागाळा च्या महिला तलाठी स रंगेहाथ अटक ‼️

1047

चंद्रपूर8मार्च **

‼️लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने महिला तलाठ्यास चार हजार रुपयाची लाच घेताना नागाळा तलाठी कार्यालयात आज अटक केली. प्रणाली तुंबडवार नावाच्या या महिला तलाठ्यानं फेरफार करण्याच्या मोबदलयात पाच हजार रुपयाची मागणी केली होती. फिर्यादीने याची तक्रार ACB चंद्रपूर येथे करत आज ACB ने लाच घेताना अटक केली आहे. ACB ने आतापर्यंत भ्रष्टाचार चा चौकार ठोकला असून चांगलीच नाकेबंदी करत ट्रॅप यशस्वी केला आहे. सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या नेतृवात पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या टीमने केली आहे.