रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून देशी कट्टा आणि काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
**चंद्रपुर:** चंद्रपुर जिल्ह्यात अवैध धंदे आणि हत्यार बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मोहिमेदरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून देशी कट्टा आणि दोन जीवंत काडतुस जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजा पडोली येथील डी.एन.आर. ऑफीसच्या मागे रेल्वे लाईनजवळ एक इसम गावठी देशी कट्टा लावून उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तपासात त्याच्या कमरेला एक देशी कट्टा आणि पेटच्या खिशात दोन जीवंत काडतुस जप्त करण्यात आले.
आरोपीचे नाव नौशाद शाहादातुल्ला कुरेशी असून त्याच्यावर चोरी, जबरी चोरी आणि घरफोडी अशा अनेक गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत. तसेच तो अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता. आरोपीच्या विरोधात अवैध शस्त्र बाळगणेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुढील तपासासाठी पोस्टे पडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
**पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक:**
पोलिस अधीक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारीवर अंकुश लावायला मदत होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्तके ली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि, बोबडे, सपोनि, नागेशकुमार चतरकर, सपोनि, किशोर शेरकी, पोउपनि, विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, नापोको, संतोष येलपुलवार, पोकों, गोपाल आतकुलवार, पोकों. नितीन रायपुरे यांनी केली आहे.