घुग्गुसचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांची बल्लारशाह येथे बदली
चंद्रपूर : घुग्गुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांची बल्लारशाह येथे बदली करण्यात आली आहे. काल रात्री पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढले.
आसिफराजा शेख यांनी आज बल्लारपूर येथे पोलीस निरीक्षक पदाचा पदभार घेतला आहे. कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले शेख यांच्या बदलीमुळे घुग्गुस परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घुग्गुस येथे कार्यरत असताना शेख यांनी अवैध धंद्यांवर पूर्णपणे निर्बंध लादून गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली. त्यांच्या कार्यकाळात कुठलीही अनुचित घटना घडली नाही.
मूळचे सोलापूर चे असलेले शेख यांची मराठी भाषेवर चांगली पकड आहे. यापूर्वी त्यांनी नागपूर जिल्ह्यातही कार्यभार सांभाळला आहे. गुन्हेगारीवर नकेल कसण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
शेख यांच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये नाराजी
शेख यांच्या बदलीमुळे घुग्गुस परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी त्यांच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. नागरिकांनी शेख यांच्या पुन्हा येथे रुजू होण्याची मागणी केली आहे.