सोळा वर्षा खालील मुलांना कोचिंग क्लासेसला प्रवेश नको…

240

सोळा वर्षा खालील मुलांना कोचिंग क्लासेसला प्रवेश नको…

चांगले गुण, रँकचे फसवे आश्वासन दिल्यास दिशाभूल केल्यास एक लाखाचा दंड..

शिक्षण मंत्रालयाचा दणका!
-नागपूर – केंद्र सरकारने सोळा वर्षाखालील विध्यार्थाना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश न देण्याचे दिशा निर्देश जारी केले आहे.
कोचिंग क्लासेसच्या फोफावत चाललेल्या बाजाराला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी व त्याचे कठोर नियमन करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने दिशानिर्देश जारी करत राज्य सरकार वरही कोचिंग क्लासेस संस्थाच्या कारवाई वर देखरेख ठेवण्याची जवाबदारी टाकली आहे. विध्यार्थांच्या वाढत्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्णय घेत याचे उल्लंघन केल्यास कोचिंग क्लासेस ला एक लाख रुपयाचा दंड थोटवणार आहे. विध्यार्थ्यांची व पालकांची दिशाभूल करणारी जाहिराती, तसेच चांगले गुण, रँकचे फसवे आश्वासन न देण्याची ही तंबी देण्यात आली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात कठोर परीक्षा तसेच होणाऱ्या तणावापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ही पावले उचलली आहे. तसेच विध्यार्थ्याने जर अर्ध्यातच अभ्यासक्रम सोडला तर त्याचे अर्धे शुल्क सुद्धा परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.