चंद्रपूर: 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
दुर्गापूर पोलीस निरीक्षक पदी लता वाढीवे तर वाहतूक शाखा पदी जय प्रकाश निर्मल..
स्थानिक गुन्हे शाखेत हर्षल एकरे आणि विकास गायकवाड
चंद्रपूर – जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या काल जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशीं यांनी जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या 65 अधिकाऱ्यांच्या यादीत पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस उप निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नागभीड चे ठाणेदार योगेश घारे यांची वीरूर पोलीस निरीक्षक, गोंडपिपरी चे ठाणेदार जीवन राजगुरू यांची सावली चे पोलीस निरीक्षक पदी,तसेच रामनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांची स्थानिक गुन्हे शाखा तसेच कोठारी चे ठाणेदार विकास गायकवाड यांची सुद्धा स्थानिक गुन्हे शाखे मध्ये वर्णी लागली आहे.स्थानिक गुन्हे शाखे मधील पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांची रामनगर पोलीस स्टेशन ला बदली करण्यात आली आहे.