सुपर…एल सी बी 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवरल्या..पेट्रोल पंप दरोडा..
चंद्रपूर – राजुरा तालुक्यातील वरुड रोड वर असलेल्या साई कृपा पेट्रोल पंप वर आज पहाटे सशस्त्र दरोडा टाकत बंदूक आणि कोयता दाखवत पांच लुटाऱ्यांनी एक लाख नव्वद हजार रुपये लुटले. दरम्यान पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं यांनी तात्काळ दखल घेत घटनास्तळ गाठले व लगेच दखल घेत तपास चक्रे स्थानिक गुन्हे शाखेला दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृवात त्यांच्या टीमने जलद गतीने तपासाचे गांभीर्य आणि सी सी टी वी चे फुटेज तपासून तपास सुरु केला. पांच ही आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवरत त्यांना 24तासाच्या आत अटक केली आहे. तीन आरोपी हे लक्कडकोट मधले असून दोन आरोपी हे कोरपना तालुक्यातील पारधी गुडा येथील आहे नवीन वर्षात स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या धडाकेबाज कारवाई मुळे त्यांना मोठे यश मिळाले आहे.