खनिकर्म अधिकाऱ्यांच्या चुकीला पांघरून घालून सारवासावर करण्याचा डाव!

297

खनिकर्म अधिकाऱ्यांच्या चुकीला पांघरून घालून सारवा सावर करण्याचा डाव!

सुरेश नैताम चे वाळू माफिंया सोबत अर्थपूर्ण संबंध असल्याचा ठपका…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी लावण्याची मागणी….

चंद्रपूर – वाळू माफिया ला अभयदान कुणाचे? या संधर्भात गेल्या महिन्या भरापासून जिल्ह्यात चर्चेला पेव फुटत असताना वाळू निर्गती धोरनानुसारच विक्रीला परवानगी असल्याचे खनिकर्म विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

चंद्रपूरातील अनेक वाळू माफियासोबत जिल्हा खनिकर्म विभागाचे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याची बाब अजिबात लपून राहलेली नाही. गेल्या काही वर्षात वाळू माफिया आणि खनिकर्म विभागाचे अधिकारी कोट्यवधित खेळत आहेत. अप्पर जिल्हाधिकारी यांनी 28सप्टेंबर रोजी स्पष्ट शब्दात दिलेल्या आदेशाचे अवलोकन न करता जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी गेल्या महिन्यात 24घाटावरून शिल्लक वाळू साठा उचल करण्याची परवानगी दिली. परिणामी चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूची वाहतूक सुरु झाली आणि त्या आड घाटानवरून आणखी वाळूचा उपसा केल्या गेला आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला ठेंगा दाखवत जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी तब्बल 24घाटावरून शिल्लक साठा उचलण्याची परवानगीच देऊन टाकली म्हणजे रेती माफियांना रान मोकळे करून दिले त्यासाठी मोठी आर्थिक तडजोड झाल्याचाही त्यांच्यावर ठपका लागलेला आहे. त्यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवर नैताम यांच्या अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहे.

नैताम यांनी आता सारवा सारव करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वाळू निर्गती धोरणनुसारच विक्रीला परवानगी देण्यात आल्याचा प्रचार सुरु केला आहे. मात्र अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे काय ते अद्याप नैताम यांच्या स्पष्टीकरणानंतर ही समजून येत नाही आहे. जिल्हा खनिकर्म विभागाचे स्पष्टीकरण म्हणजे सुरेश नैताम यांच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर शासनाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.