महाराष्ट्र पोलीसमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, २ जानेवारी २०२४: महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) च्या कलम २२न यामधील तरतुदींनुसार, महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांचा समावेश आहे.
या बदल्यांनुसार, श्री. श्रवण दत यांची पोलीस अधीक्षक नंदुरबार, श्री. प्रद्युम्न आर. पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, श्री. अविनाश एम. बारगळ यांची गुन्हे अन्वेषण अमरावती, श्री. बच्चन सिंग यांची पोलीस अधीक्षक अकोला आणि श्रीम. चेतना शेखर तिडके यांची पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर येथून अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई या पदावर बदली करण्यात आली आहे.
श्री. संदीप घुगे, भा.पो.से., यांची पोलीस अधीक्षक, अकोला या पदावरुन, याद्वारे, बदली करण्यात येत असून त्यांच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पुढील काळात निघणार आहेत. यामध्ये पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश राहणार आहे.