तहसीलदार होळी ची सटकली? बेताल भाषेत सामाजिक संघटनेला चोरट लिखाण करणे अंगलट..

1491

तहसीलदार होळी ची सटकली? बेताल भाषेत सामाजिक संघटनेला चोरट लिखाण करणे अंगलट…

चंद्रपूर – जिल्ह्यात रेती तस्करांची आगेकूच होत असताना त्यावर आळा बसावा या करीता जिल्ह्यात सातत्याने सामाजिक संघटना, ग्रामस्थ तसेच पत्रकार वर्गातून मोठ्या प्रमाणात या विषयी आवाज उठवण्यात येत आहे. रेती माफियानी महसूल आणि पोलीस प्रशासन सोबत मधुर संबंध बनवत आपली हेकेखोरी करत रेती तसकरांनी विरोध करण्याऱ्यावर हल्ले चडवले आहे. अश्या भ्याड हल्लेखोरांना पकडण्यात पोलीस प्रसाशन अद्यापही अयशस्वी झाल्याचे दिसत आहे.

मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती चोरी आणि रेतीचा उपसा करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी यासाठी नुकतेच एका सामाजिक संघटनेने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. मूल येथील त्या संघटनेने दिलेले निवेदनाचे फोटो हे “मूल प्रेस -प्रशासन सन्मवय “या व्हाट्सअप ग्रुप टाकले असता त्यावर मूल चे तहसीलदार रवींद्र होळी यांनी “रेती चोरच निवेदन देतात तेव्हा “हा मेसेज आपल्या मोबाईल द्वारे टाकून त्या लोकांची रेती चोराची शी तुलना केल्याने तहसीलदार होळी वर चांगलीच गदा आली आहे.

एका प्रशासन अधिकाऱ्याने पहिल्यांदाच आपले भान हरपून या प्रकारची कंमेंट करणे म्हणजे मंद्बुद्धीचा परिचय देने होय. रेती चोरांशी कोणाची साठगाठ आहे हे तालुक्याला चांगल्याच प्रकारे आहे. या आधीही तहसीलदार होळी यांच्यावर SIT चौकशी लावावी या करीता एका संस्थेने निवेदन दिले आहे. भ्रस्टाचाराचे ग्रहण लागलेल्या या अधिकाऱ्याला कायद्याचे जरा कमी शेरे माहिती आहे.

स्वतःची नियमावली लावत या अधिकाऱ्याचे चांगलेच मधुर संबंध आज पावेतो रेती तसकरांसोबत गाजलेले असल्याचे आरोप होत आहे. बेताल भाषेत स्वतःला हुशार समजाणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी महोदय कडे तक्रार करण्यात येणार आहे.