गोंडपिपरीतील कुलथा रेती घाटावर सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षावर जीवघेणा हल्ला
महसूल आणि पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
चंद्रपूर, २८ डिसेंबर २०२३- गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावर बुधवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास गावकरी आणि रेती घाट चालकांमध्ये मोठी धक्कामुक्की झाली. अवैध उपसा करण्याच्या विरोधात सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावकरी यांनी रेतीच्या गाड्या अडवल्या. यावेळी रेती घाट धारक आणि गावकरी यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यांनी सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षावर राफ्टर आणि धारदार शस्त्रांनी जबर मारहाण केली.
या हल्ल्यात सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. जवळपास १० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे तारडा येथील वातावरण चिघळले आहे. पोलीस आणि प्रशासन या घटनेला जबाबदार असल्याचे गावाकऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा बघ्याची भूमिका घेत असल्याचा प्रशासनावर गंभीर आरोप गावकर्यांनी केला आहे.